नुकतेच केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे युगुल जोशी लिखित ‘कहो कालिदास! (Kaho Kalidasa!)या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते युगुल जोशी लिखित आणि महाकवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित ‘कहो कालिदास!’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले आहे.
  • नवी दिल्लीतील 'इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (Indira Gandhi National Centre for the Arts - IGNCA)' येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • 'मंजुल पब्लिशिंग हाऊसमार्फत (Manjul Publishing House)' या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले आहे.
  • महाकवी कालिदास हे प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध अभिजात संस्कृत कवी आणि नाटककार होते.
  • हे पुस्तक मुख्यतः कालिदास यांचे जीवन आणि त्यांच्या साहित्यातील प्रेम, विरह, जबाबदारी आणि निसर्ग यांसारख्या विविध पैलूंचा आढावा घेते.

महाकवी कालिदास यांच्या महान साहित्यकृती:

  • अभिज्ञानशाकुंतलम्मा
  • लविकाग्निमित्रम्
  • विक्रमोर्वशीयम्
  • महाकाव्य रघुवंशम्